Lamp Lighting and Oath Taking Ceremony 2019-20

Nursing    28-Feb-2020
Total Views |

Lamp Lighting and Oath Ta

 
 
 

डॉक्टरांपेक्षाही नर्सिंग स्टाफ हा रुग्णांच्या जास्त संपर्कात असतो : प्रा.डॉ. दिलीप म्हैसेकर

सोमवार दि. १०/०२/२०२० रोजी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोंसला इंस्टीट्युट ऑफ नर्सिंग महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रथम वर्ष बेसिक बी. एस्सी. नर्सिंग कोर्स प्रवेशित विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व ओथ टेकिंग’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास प्रा.डॉ. दिलीप म्हैसेकर - मा. कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक हे प्रमुख अतिथी व श्री. मकरंद धर्माधिकारी - मुख्य कार्यपालन अधिकारी, श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक हे सन्माननीय पाहुणे व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

डॉक्टरांपेक्षाही नर्सिंग स्टाफ हा रुग्णांच्या जास्त संपर्कात असतो त्यामुळे नर्सिंग क्षेत्राचे खूप जबाबदारीचे काम आहे. सध्या जगभरात प्रत्येक रुग्णालयाच्या व्यवस्थापनात नर्सेसचा महत्वाचा वाटा आहे. जगभरात सध्या नर्सेस चा तुटवडा भासत आहे. आणि यासाठी सें. हिं. मि. एज्यु. सोसायटी, नाशिक संचलित भोंसला इंस्टीट्युट ऑफ नर्सिंग मधून घडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळून परदेशात भासत असलेल्या नर्सेसच्या तुटवड्यावर परिणामकारक ठरतील. व नुसते संस्थेचे, नाशिकचे किंवा राज्याचे नव्हे तर संपूर्ण भारताचे नाव जगभरात उज्वलित करतील.” असे प्रतिपादन प्रा.डॉ. दिलीप म्हैसेकर - मा. कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी याप्रसंगी केले.

चांगले राहणीमान असण्यापेक्षा राहणीमानाची गुणवत्ता चांगली असणे जास्त गरजेचे असते. नर्सिंग हे क्षेत्र समाज सेवा करण्याचे साधन आहे व सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात नाही तर सद्यस्थितीला नर्सिंग क्षेत्रात अनेक उत्तमोत्तम संधी निर्णाम होणार झाल्या आहेत. रुग्णांच्या जास्त संपर्कात येणारा घटक म्हणजे नर्सिंग क्षेत्र त्यामुळे नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संवेदनशील, दक्ष, शिस्तप्रिय व समाजसेवा जोपासणे तितक्याच महत्वाचे असते.असे श्री. मकरंद धर्माधिकारी - मुख्य कार्यपालन अधिकारी, श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

श्री. हेमंत देशपांडे - कार्यवाह, सें. हिं. मि. एज्यु. सोसायटी, नाशिक विभाग, नाशिक यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना सोसायटीने आज पर्यंत देशसेवेसाठी तरुण निर्माण करण्याचे काम केले होते पण भोंसला इंस्टीट्युट ऑफ नर्सिंग महाविद्यालय सुरु करून सोसायटीने देशेसेवेबरोबरच समाजासाठी शुश्रूषा देणारे तरुणही निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्याचबरोबर याप्रसंगी त्यांनी संस्थेने हाती घेतलेल्या देशसेवेची व समाजसेवेची आठवण करून दिली. व शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सदरील सोहळ्या दरम्यान मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘कार्निवल फेस्ट- २०२०’ अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.

या प्रसंगी इ.एस.आय.सी. रुग्णालयाच्या परिचर्या अधिक्षक सौ. सरोज जवादे व सें. हिं. मि. एज्यु. सोसायटीचे सदस्य श्री. हेमंत पाठक, श्री. नरेंद्र वाणी व भोंसला मिलिटरी स्कूलचे कमांडंट विंग कमांडर अनिल सिन्हा (निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्षाचा अहवाल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. बाळासाहेब घुले यांनी सादर केला. नर्सिंग ट्युटर श्री. शालोम शिंदे व ग्रंथपाल सौ. रोहिणी धनाईत यांनी संपूर्ण सोहळ्याचे तर लेक्चरर श्री. अमोल शेळके यांनी पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन केले. तसेच सौ.स्मिता अनिश यांनी सदरील सोहळ्याचे आभार प्रदर्शन केले. सदरील सोहळ्यास सर्व विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.